अबुधाबी: IPL 2020 २०२० मध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइड रायडर्सने दिल्ली कॅपिटर्सचा ५९ धावांनी पराभव केला. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करत कोलकाताने २० षटकात ६ बाद १९४ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल दिल्लीला ९ बाद १३५ धावा करता आल्या. पाच विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती KKRच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

वाचा-

नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताची सुरूवात खराब झाली. शुभमन गिल ९, राहुल त्रिपाठी १३ तर दिनेश कार्तिक ३ धावांवर बाद झाले. KKRची अवस्था ३ बाद ४२ अशी होती. त्यानंतर सलामीवीर नितिश राणा आणि सुनिल नरेन यांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागिदारी केली. राणाने या हंगामातील पहिले तर आयपीएल करिअरमधील १०वे अर्धशतक केले. सुनिल नरेन ६४ धावा करून बाद झाला. त्याने ३२ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकार मारले.

वाचा-

राणा १९व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर बाद झाला. त्याने ५३ चेंडूत ८१ धावा केल्या. यात १ षटकार आणि १३ चौकरांचा समावेश होता.

वाचा-

विजायसाठी १९५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीला पहिल्या चेंडूवर झटका बसला. पृथ्वी शॉच्या बदली संघात घेतलेला अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. त्यानंतर शतकवीर शिखर धवन ६ धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीची जोडी बाद झाल्याने दिल्लीची अवस्था २ बाद १३ अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी डाव सावरला. ही जोडी जम बसण्याआधी पंतला वरुण चक्रवर्तीने () २७ धावांवर बाद केले. त्यानंतर १४व्या षटकात त्याने एका पाठोपाठ एक अशा दोन विकेट घेत दिल्लीची अवस्था ५ बाद ९५ अशी केली.

वाचा-

चक्रवर्तीने १४व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर हेटमायर आणि तिसऱ्या चेंडूवर अय्यरची विकेट घेतली. त्यानंतर धोकादायक मार्कस स्टोयनिस, अक्षर पटेल यांना माघारी पाठवले आणि संघाचा विजय निश्चित केला. कोलकाताकडून चक्रवर्तीने ४ षटकात २० धावा देत ५ विकेट घेतल्या.

वाचा-

या विजयामुळे कोलकाताचे ११ पैकी ६ सामन्यातील विजयासह १२ गुण झाले आहेत. गुणतक्त्यात त्यांचे स्थान बदलले नसले तरी प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने त्यांनी स्वत:चे स्थान भक्कम केले आहे. देखील सामन्याआधी ज्या दुसऱ्या स्थानावर होता तेथेच आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here