दुबई : आज सकाळी किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघातील मनदीप सिंगच्या वडिलांचे निधन झाले. पण वडिलांच्या निधनानंतरही मनदीप आज आयपीएलचा सामना खेळत असल्याचे पाहायला मिळाले. दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरही मनदीपने ही गोष्ट आपल्या देहबोलीतून दाखवली नाही. आजच्या सामन्यात त्याला पंजाबने संधी दिल्याचे पाहायला मिळाले. पण वडिलांच्या निधनानंतरही मनदीप आपले कर्तव्य विसरला नसल्याचे पाहायला मिळाले.

आजच्या सामन्यात पंजाबकडून मयांक अगरवाला संघातून बाहेर ठेवण्यात आले. मयांकच्या जागी मनदीपला आजच्या सामन्यात संधी देण्यात आली. मनदीप हा पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलबरोबर सलामीला आल्याचे पाहायला मिळाले आहे. आता मनदीप या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

काही दिवसांपासून मनदीपचे वडिल आजारी होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण आज सकाळी मनदीपच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त सर्वांसमोर आले. हे वृत्त मनदीपलाही आज सकाळी समजले. पण घरी न जाता मनदीपने संघाबरोबर युएईमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात मनदीपला पंजाबच्या संघाने संधी दिली. त्यामुळे मनदीपचे आज पंजाबच्या संघात पुनरागमन झाल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या काही सामन्यांमध्ये पंजाबने दमदार विजय मिळवले आहेत. त्यामुळे बाद फेरीत पोहोचण्यासाठी पंजाबसाठी हैदराबादविरुद्धचा आजचा सामना महत्वाचा होता. त्यामुळे वडिलांच्या निधनाची वाईट बातमी येऊनही मनदीपने संघाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. बाद फेरीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आजचा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण हा सामना जिंकल्यावर पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही संघांना बाद फेरीच्या दिशेने कूच करता येणार आहे. त्यामुळे पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असेल.

(मनदीपच्या वडिलांच्या निधनाची बातमी आयपीएलच्या समालोचकांनी दिली. सामना सुरु होण्यापूर्वी समालोचकांनी ही माहिती सर्वांना सांगितली. त्याचबरोबर क्रिकइन्फो या संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे.)

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here