दुबई : किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने अखेरच्या षटकात सनरायझर्स हैदराबाद संघावर १२ धावांनी विजय मिळवला. हा पंजाबचा सलग चौथा विजय ठरला. या विजयानंतर पंजाबने गुतालिकेत चांगलीच झेप घेतल्याचे पाहायला मिळाले. पंजाबच्या हैदराबादवर विजय मिळवल्यानंतर गुणतालिकेत नेमका काय बदल झाला,

या लढतीपूर्वी पंजाबच्या संघाने १० सामने खेळले होते. या १० सामन्यांमध्ये पंजाबने चार विजय मिळवले होते, तर त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पण आजच्या ११व्या सामन्यात पंजाबच्या संघाने हैदराबादवर विजय मिळवला. या विजयासह पंजाबच्या संघाने दोन गुण पटकावले आहेत. या दोन गुणांसह पंजाबच्या संघाने १० पॉइंट्स झाले आहेत. या १० गुणांसह पंजाबच्या संघाने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे.

या सामन्यात हैदराबादला पराभव पत्करावा लागला. या लढतीपूर्वी हैदराबादच्या संघाने १० सामने खेळले होते. या १० सामन्यांमध्ये हैदराबादने चार विजय मिळवले होते, तर त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. आजच्या ११व्या सामन्यात हैदराबादला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता हैदराबादच्या खात्यामध्ये सात पराभव झाले आहेत. पण त्यांचे या आयपीएलमधील आव्हान अजूनही कायम आहे. सध्याच्या घडीला हैदराबादचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

गुणतालिकेत अव्वल स्थान मुंबई इंडियन्सच्या संघाने पटकावले आहे. दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. आजच्या विजयानतर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ चौथ्या स्थानावर कायम आहे.

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने बाजी मारली. पंजाबने हैदराबादपुढे विजयााठी १२७ धावांचे माफक वाटणारे आव्हान ठेवले होते. पण भेदक गोलंदाजीच्या जोरावर पंजाबने हैदराबादवर १२ धावांनी विजय मिळवला. पंजाबकडून यावेळी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका वठवली. या दोघांनी अचूक गोलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here