वाचा-
चेतन शर्मा यांनी रुग्णालयातील डॉक्टर अतुल माथुर यांच्या सोबत कपिल देव यांचा एक फोटो शेअर केला आहे. माथुर यांनीच देव यांच्यावर अँजिओप्लॅस्टी केली होती. शर्मा यांनी डिस्चार्जच्या वेळीचा फोटो ट्विट केला आहे. डॉक्टर अतुल माथुर यांनी कपिल पाजी यांच्यावर अँजिओप्लॅस्टी केली. आता ते ठिक आहेत आणि रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
वाचा-
वाचा-
याआधी चेतन शर्मा यांनी कपिल देव आणि त्यांच्या मुलीचा रुग्णालयातील फोटो शेअर केला होता. तेव्हा त्यांनी कपिल देव यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले होते. त्या फोटोत कपिल देव दोन्ही हातांनी थम्स अप करताना दिसत होते.
कपिल देव यांना हृदय विकाराचा धक्का बसल्यानंतर सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि अन्य लोकांनी त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. देशाला सर्व प्रथम वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव हे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे यशस्वी गोलंदाज आहेत.
कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ५२४८ धावा आणि ४३४ बळींची नोंद आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कपिल यांनी ३७८३ धावा केल्या तसेच २५३ बळी घेतले. १९९४ मध्ये फरीदाबाद येथे वेस्ट इंडीज विरूद्ध त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times