वाचा-
स्पर्धेत प्रथमच प्लेऑफमध्ये न पोहोचता संघ बाहेर पडणार आहे. त्यात गुणतक्त्यात अखेरच्या स्थानावर राहिलेल्या चेन्नईने आता सर्व लक्ष्य पुढील वर्षावर केंद्रीत केले आहे. धोनीने उर्वरित तीन सामन्यासाठी युवा खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले. या संधी पुढील वर्षाच्या आयपीएलचा विचार करून दिली जाणार असल्याचे तो म्हणाला. त्याच बरोबर या वर्षी ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ देणार नाही.
वाचा-
तुमचा १० विकेटनी पराभव होतोय की ८ विकेटनी ही गोष्टी महत्त्वाची नसते. सध्या स्पर्धेत तुम्ही कुठे आहात ही गोष्टी दु:खी करत असते. अंबाती रायडू जखमी झाला. अन्य फलंदाज १०० टक्के देऊ शकले नाहीत. नशिबाने साध दिली नाही. ज्या सामन्यात आम्ही प्रथम फलंदाजी करू इच्छितो तेथे टॉस जिंकू शकलो नाही.
वाचा-
१०० कारण दिली जाऊ शकतात
पुढे म्हणाला की, खराब कामगिरीवर १०० कारण दिली जाऊ शकतात. पण त्यापेक्षा हे महत्त्वाचे आहे की, आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो का? आतापर्यंतचा आमचे जे रेकॉर्ड होते त्यानुसार आम्ही खेळलो का? आम्ही प्रयत्न केले पण यशस्वी ठरले नाही. पुढील तीन सामन्यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल.
संघात होणार मोठे बदल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाच्या कामगिरीवर व्यवस्थापन निराश आहे आणि निश्चितपणे टीममध्ये बदल केले जाणार आहेत. बीसीसीआयद्वारे लिलाव केल्या जाणाऱ्या खेळाडूंवर गोष्टी अवलंबून असतील. पुढील आयपीएलसाठी फार फेळ नाही. त्यात असे वृत्त आले आहे की, मोठा लिलाव होणार नाही. त्यामुळे उपलब्ध खेळाडू आणि अन्य संघ कोणत्या खेळाडूंना सोडतात त्यावर लिलावातील गोष्टी अवलंबून असतील.
रैना, हरभजन यांना डच्चू
संघातील सिनियर खेळाडू सुरेश रैना स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच युएईमधून बाहेर गेले होते. त्यानंतर हरभजन सिंगने माघार घेतली. या दोन्ही खेळाडूंना संघ बाहेर ठेवण्याचा विचार करत आहे. तर शेन वॉट्सन, इमरान ताहिर, पीयुष चावला, केदार जाधव यांना पर्याय शोधले जाणार आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times