नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात काल शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने १२६ धावा करू देखील विजय मिळवला. त्यांनी सनरायजर्स हैदराबादचा १२ धावांनी पराभव केला. पंजाबचा हा सलग चौथा विजय ठरला आहे. हैदराबादचे ५ फलंदाज फक्त दोन धावा करून बाद झाले. पंजाबच्या या धमाकेदार विजयामुळे ते गुणतक्त्यात ५व्या स्थानावर पोहोचले आहेत.

वाचा-

आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी धावांचा बचाव करण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर आहे. जाणून घेऊयात सर्वात कमी धावांचा बचाव कोणत्या संघांनी केला आहे.

वाचा-

५] मुंबई विरुद्ध पुणे- १२० धावाआयपीएलमध्ये सर्वात कमी धावांचा बचाव करणाऱ्या संघांच्या यादीत पाचव्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा क्रमांक लागतो. त्यांनी २०१२ साली पुणे संघाविरुद्ध १२० धावांचा बचाव केला होता. लसिथ मलिंगा आणि हरभजन सिंग यांनी शानदार गोलंदाजी करत मुंबईला १ धावाने विजय मिळवून दिला.

४] हैदराबाद विरुद्ध पुणे- ११९ धावा
या यादीत चौथ्या स्थानावर पराभूत होणारा संघ पुणेच आहे. २०१३ साली हैदराबादचा ११९ धावांवर ऑलआउट केल्यानंतर देखील त्यांना विजय मिळवता आला नाही. अमित मिश्राने हॅटट्रिक घेत हैदराबादला ११ धावांनी विजय मिळवून दिला होता.

वाचा-

३] पंजाब विरुद्ध मुंबई- ११९ धावा
२०१८च्या आयपीएलमध्ये पंजाबने मुंबई विरुद्ध ११९ धावांचा बचाव केला होता. युवराज सिंग, इरफान पठाण आणि युसुफ अब्दुल्ला यांनी शानदार गोलंदाजी करत मुंबईचा ३ धावांनी पराभव केला होता.

२]हैदराबाद विरुद्ध मुंबई- ११८ धावा
मुंबई इंडियन्स या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांना हैदराबादविरुद्ध ११८ धावा करता आल्या नव्हत्या. या सामन्यात मुंबईकडून क्रुणाल पांड्या आणि सुर्यकुमार यादव यांनाच दुहेरी धावसंख्या करता आली.

१] चेन्नई विरुद्ध पंजाब- ११६ धावा
तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाच्या नावावर स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा विक्रम आहे. २००९ साली पंजाब विरुद्ध त्यांनी फक्त ११६ धावा केल्या. पंजाबला या सामन्यात २० षटकात ८ बाद ९२ धावा करता आल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here