आबुधाबी: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने एक भन्नाट झेल पडकल्याचे पाहायला मिळाले. हा झेल पाहून राजस्थानच्या खेळाडूंनाही धक्का बसला आणि त्यांनाही आपल्या तोंडात बोटं घालावी लागली. आर्चरने जेव्हा हा झेल पकडला तेव्हा कोणलाही त्यावरर विश्वास बसला नव्हता. कारण हवेत उडी मारून फक्त एका हातात आर्चरने झेल पकडला होता. यावेळी राजस्थानच्या खेळाडूंना आर्चरने झेल पकडला आहे, यावर विश्वासच बसला नव्हता. पण या झेलचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ही गोष्ट घडली ती ११व्या षटकात. यावेळी राजस्थानचा कार्तिक त्यागी गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मुंबईच्या इशान किशनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. हा फटका षटकार जाईल, असे जवळपास सर्वांनाच वाटत होते. पण थर्ड मॅनला त्यावेळी आर्चर उभा होता. आर्चरने चेंडूचा चांगलाच अंदाज घेतला.

हा चेंडू आपल्याजवळ आल्यावर आर्चरने हवेत उडी मारली आणि फक्त एका हातात त्याने हा झेल पकडला. आर्चरने हा झेल पकडला आहे, यावर राजस्थानच्या खेळाडूंचाही विश्वास बसला नाही. गोलंदाज कार्तिक त्यागीलाही आर्चरने हा झेल टिपला आहे, यावर विश्वास बसला नव्हता. त्याचबरोबर संघातील रायन पराग आणि बेन स्टोक्स यांनाही हा झेल पकडल्याचे वाटत नव्हते. कारण या सर्वांच्या प्रतिक्रीया या आश्चर्यकारक अशाच होता.

मुंबईच्या इशानही यावेळी आपण बाद झालो आहोत, यावर विश्वास बसला नाही. या झेलचा जेव्हा रिप्ले दाखवण्यात आला तेव्हा आर्चरचे दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. मुंबईला पहिल्याच षटकात धक्का बसला असला तरी त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली भागीदारी रचली. इशान आणि सूर्यकुमार यांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचली. यावेळी इशानपेक्षा सूर्यकुमार हा जलदगतीने धावा जमवत होता. पण यावेळी इशानचा अप्रतिम झेल जोफ्रा आर्चरने पकडला आणि मुंबईला दुसरा धक्का दिला. इशान किशनने यावेळी चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३७ धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here