आबुधाबी: बेन स्टोक्सच्या झंझावाती शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर दमदार विजय मिळवला. या विजयानंतर राजस्थानने आपले या आयपीएलमधील आव्हान जीवंत ठेवले आहे. मुंबई इंडियन्सवर मोठा विजय साकारत राजस्थानने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या विजयानंतर राजस्थानने गुणतालिकेत नेमके कोणते स्थान पटकावले, पाहा…

रविवारच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवल्यावर राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर गेला होता. यापूर्वी राजस्थानच्या संघाने ११ लढती खेळल्या होत्या आणि त्यांना चार सामन्यांमध्येच विजय मिळवता आला होता. त्याचबरोबर राजस्थानला सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा आठ गुणांसह आठव्या स्थानावर होता. आजच्या १२व्या सामन्यात राजस्थानने दमदार विजय साकारला. आजच्या सामन्यातील विजयासह राजस्थानने दोन गुण कमावले आहेत. या दोन गुणांसह राजस्थानच्या संघाने गुणतालिकेत आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे यापुढील दोन्ही सामन्यांत जर त्यांनी विजय मिळवले तर नक्कीच त्यांचे या स्पर्धेतील आव्हान कायम राहू शकते.

मुंबई इंडियन्सच्या संघाला आजच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. यापूर्वी मुंबईच्या संघाने दहा सामने खेळले होते. या दहा सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने सात विजय मिळवले होते, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आजच्या ११व्या लढतीत मुंबईला राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. पण या पराभवानंतरही मुंबईच्या अव्वल स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. या पराभवानंतरही मुंबई अव्वल स्थानावर कायम आहे.

सध्याच्या घडीला गुणतालिकेत तीन संघाचे समान १४ गुण झाले आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी या तिन्ही संघांचे सध्या १४ गुण आहेत. पण रनरेट चांगला असल्यामुळे मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवला असता तर आरसीबीच्या संघाला गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याची संधी होती. पण आज आरसीबीचा पराभव झाल्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here