नवी दिल्ली: युएईमध्ये सुरू असलेल्या २०२०चा थरार सध्या अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. अद्यात अर्थात गुणतक्त्यातील पहिले चार संघ कोणते असतील हे निश्चित झालेले नाही. साखळी फेरीतील सामने अंतिम टप्प्यात आले असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलच्या प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याच बरोबर बीसीसीआयने महिला टी-२० चॅलेंज अर्थात महिला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले.

वाचा-

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार ५ नोव्हेंबर रोजी पहिला क्वालिफायर सामना दुबईत होणार आहे. भारतीय वेळेनुसार साडे सात वाजता ही लढत सुरू होईल. गुणतक्त्यात पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघात हा सामना होणार आहे. या सामन्यातील विजय संघ थेट फायनलमध्ये जाईल.

त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी अबुधाबी मैदानावर एलिमेनेटरची लढत साडे सात वाजता सुरू होईल. ही लढत गुणतक्त्यातील तिसरा आणि चौथा संघ यांच्यात असेल. ही लढत जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात खेळू शकेल. तर पराभव होणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल.

वाचा-

क्वालिफायरमधील दुसरी लढत ८ नोव्हेंबर रोजी अबुधाबी मैदानावर साडे सात वाजता सुरू होईल. यातील विजेता फायनलसाठी पात्र होईल. आयपीएल २०२०ची फायनल दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर १० नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार साडे सात वाजता सुरू होईल.

असे आहे वेळापत्रक

महिला आयपीएल २०२०

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here