मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अष्टपैलू कसोटीपटू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपण बापू नाडकर्णी यांचे विक्रम ऐकत वाढलो असल्याचं सचिन म्हणाला. सलग २१ निर्धाव षटके टाकण्याच्या विक्रमाचाही सचिनने उल्लेख केला आणि शोक व्यक्त केला.

बापू नाडकर्णी यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. बापू नाडकर्णी यांना बीसीसीआयसह क्रिकेट जगतातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली. बापू नाडकर्णी यांची जगातील सर्वात कंजूष गोलंदाज अशी ओळख होती.

बापू नाडकर्णी यांनी १९५५ ते १९६८ या काळात भारतीय कसोटी संघाचं प्रतिनिधित्व केलं. जन्माने नाशिककर असलेले बापू १९५०-५१ मध्ये पुणे विद्यापीठाकडून ते रोहिंटन बरिया चषकात खेळले. त्यानंतर १९५१-५२ मध्ये महाराष्ट्राच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दोन वर्षांनंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर तेव्हाच्या बॉम्बे संघाविरुद्ध त्यांनी आपले पहिले शतक झळकावले. १०३ मिनिटांच्या खेळीत त्यांनी हे शतक साकारले होते. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here