नवी दिल्ली: IPL 2020 इतिहासात असे कधीच झाले नाही की () ने सहभाग घेतला आणि ते प्ले ऑफमध्ये पोहोचले नाहीत. आतापर्यंत झालेल्या १२ हंगामात चेन्नईने १० स्पर्धेत भाग घेतला. त्यापैकी सर्व हंगामात हा संघ किमान प्ले ऑफमध्ये गेला होता. यापैकी ८ वेळा ते अंतिम सामना खेळले आहेत. आयपीएल २०२०च्या अंतिम चार संघात चेन्नई दिसणार नाही हे आता निश्चित झाले आहे.

वाचा-

काल रविवारी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर ८ विकेटनी विजय मिळवला आणि अंतिम चार संघासाठी सुरू असेलली स्पर्धा आणखी चुरशीची केली. अर्थात चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई संघाला याचा तसा फरक पडणार नाही. त्यांना शिल्लक चार सामन्यापैकी एकामध्ये विजय पुरेसा आहे.

राजस्थान रॉयल्स १० गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. १४ गुणांसह ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. त्याच विजय मिळून अंतिम चार संघात स्थान मिळवू शकतात. रविवारी राजस्थानने मुंबईचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल बाहेर केले. आयपीएलमध्ये प्रथमच अशी वेळ आली आहे.

वाचा-

किंग्ज इलेव्हन पंजाब पाचव्या तर कोलकाता नाइट रायडर्स चौथ्या स्थानावर आहे. KKRचे ३ सामने शिल्लक आहेत. या सर्व सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. आज सोमवारी कोलकाता आणि पंजाब यांच्यात लढत होणार आहे. आज जर कोलकाताने विजय मिळवला आणि पुढील दोन सामन्यात पराभव झाला. तेव्हाच राजस्थान दोन सामन्यात विजय मिळून प्ले ऑफमध्ये पोहोचू शकते. अशा परिस्थितीत राजस्थानचे १४ तर कोलकाता आणि पंजाबचे प्रत्येकी १२ गुण होतील.

वाचा-

हैदराबादचा विचार केल्यास त्याच्याकडे ८ गुण आहेत आणि पुढील ३ लढती गुणतक्त्यातील अव्वल संघांविरुद्ध आहेत. या तिनही सामन्यात त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागले. जेणेकडून नेट रनरेटच्या आधारे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता राहिल.

गुणतक्त्यात अव्वल स्थानावर असलेले मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू यांना प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. अर्थात या तिनही संघांनी एकही विजय मिळवला नाही तर ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतील पण असा धोका ते पत्करणार नाहीत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here