नवी दिल्ली: राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आणि चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. राजस्थानच्या विजयामुळे चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आले. आयपीएलच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत चेन्नईने सर्व हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. २०२० हे वर्ष त्यासाठी अपवाद असेल.

वाचा-

आयपीएलच्या साखळी फेरीत चेन्नई सुपर किंग्जची गाडी रुळावल आलीच नाही. आता बेंगळुरूविरुद्ध चेन्नईने फलंदाजी, गोलंदाजीत चांगली कामगिरी केली पण तोपर्यंत उशिर झाला होता. रविवारी चेन्नईने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सहज पराभव केला. पण त्यानंतर झालेल्या सामन्यात राजस्थानने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आणि चेन्नईला प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर केले.

वाचा-

यामुळे चेन्नई संघातील खेळाडू आणि चाहते नाराज झाले. अशातच कर्णधार महेंद्र सिंह धोनीची पत्नी ( ) ने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने चेन्नईच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केलाय.

वाचा-

ट्विटवर साक्षी म्हणते की, हा फक्त एक खेळ आहे… तुम्ही लोक विजेते आहात… तुम्ही नेहमी लोकांच्या नजरेत सुपर किंग्ज असाल. साक्षीने रविवारी रात्री एक कविता शेअर केली आहे.

वाचा-

धोनी म्हणाला, ही मॅच परफेक्ट लढत होती…

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध विजय मिळवला तेव्हा प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली नव्हती. तेव्हा धोनी म्हणाला, मला वाटते की आमच्यासाठी ही एक परफेक्ट मॅच होती. सर्व गोष्टी प्लॅननुसार झाल्या. ठरवलेल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने लागू केल्या. सातत्याने विकेट घेत गेलो आणि त्यांना अशापद्धतीने रोखले की जी धावसंख्या कमी असेल. विकेट थोडी धीमी होती. फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली. ऋतुराजने चांगली सुरूवात करून दिली आणि फलंदाजीत सिद्ध करून दाखवले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here