नवी दिल्ली: आयपीएलमध्ये काल रविवारी विरुद्ध विराट कोहलीच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात बेंगळुरूने त्यांची नियमीत लाल रंगाच्या ऐवजी हिरव्या रंगाची जर्सी घातली होती. रॉयल चॅलेंजर्स प्रत्येक वर्षी एक सामना तरी या जर्सीत खेळते. पण ही जर्सी त्यांच्यासाठी फार लकी ठरत नाही.

वाचा-

गो ग्रीन अभियानासाठी प्रत्येक वर्षी एक तरी सामना हिरव्या रंगाच्या जर्सीत खेळते. २०११ साली संघाने कार्बन न्यूट्रेलिटीसाठी ही पद्धती सुरू केली त्याच बरोबर झाडे लावण्यासाठी देखील मदत केली जाते.

वाचा-

हिरव्या जर्सी घालून क्रिकेट खेळण्याचा त्यांचा हेतू चांगला असला तरी सामन्याचा निकाल मात्र त्यांच्या बाजूने येत नाही. बेंगळुरूने २०११ नंतर हिरव्या जर्सीसह १० सामने खेळले आहेत. यापैकी फक्त त्यांना फक्त दोन सामने जिंकता आलेत. हिरव्या जर्सीत बेंगळुरुने कोच्ची टस्कर्स आणि गुजरात लायन्स या संघांचा पराभव केला होता. योगायोग म्हणजे हे दोन्ही संघ सध्या आयपीएलचा हिस्सा नाहीत.

वाचा-

२०११- कोच्ची टस्कर्स विरुद्ध विजय
२०१२- मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभव
२०१३- किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध पराभव
२०१४- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभव
२०१५- दिल्ली कॅपिटल्स, सामन्याचा निकाल लागला नाही
२०१६- गुजरात लायन्स विरुद्ध विजय
२०१७- कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पराभव
२०१८- राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभव
२०१९- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभव
२०२०- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभव

वाचा-

२०१६ साली विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या शतकाच्या मदतीने गुजरात लायन्सचा १४४ धावांनी पराभव केला होता. तर २०११ साली कोच्ची टस्कर्स विरुद्ध त्यांनी विजय मिळवला होता. २०१५ साली दिल्ली डेयरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध सामन्याचा निकाल लागला नव्हता.

वाचा-

रविवारी चेन्नई सुपर किंग्जने बेंगळुरूचा ८ विकेटनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत त्यांनी ६ बाद १४६ धावा केल्या होत्या. चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या मदताने १९व्या षटकात विजय मिळवला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here