जोहान्सबर्ग: क्रिकेट विश्वाला आज एक मोठा धक्का बसला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट मंडळ अखेर बरखास्त झाले आहे. कारण क्रिकेट मंडळाच्या सर्व सदस्यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला मोठे वळण मिळाले असून आता देशातील ऑलिम्पिक समिती काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे क्रिकेट मंडळातील एका मुख्य अधिकाऱ्याला आपले पद सोडावे लागले होते. त्यानंतर याबाबत चौकशी समितीही नेमण्यात आली होती. पण या चौकशी समितीचा अवाल आम्ही सार्वजनिक करणार नाही, अशी भूमिका दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने घेतली होती. पण त्यानंतर सरकारचे दडपण वाढले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला हा अहवाल सार्वजनिक करावा लागला होता.

याबाबत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाच्या क्रिकेट मंडळाने एक पत्रक काढले आहे. या पत्रकात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने म्हटले आहे की, ” क्रिकेटच्या हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळातील सर्व सदस्यांनी आपले पद सोडले आहे. आम्ही सर्वांनी विचार विनिमय करून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळातील सर्व पदांचा आम्ही राजीनामा दिला आहे.”

आता दक्षिण आफ्रिकेची ऑलिम्पिक समिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाचा पूर्ण ढाचा बदलणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे ही समिती आता कामाला लागली आहे. त्यामुळे काही दिवसांमध्येच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळात मोठा बदल झालेला पाहायला मिळू शकतो. नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थानिक क्रिकेटला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळ नव्याने स्थापित करावे लागणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळात नेमका कोणता बदल केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. या सर्व बदलांनंतर खेळ आणि खेळाडू यांच्यावर नेमके काय परीणाम होऊ शकतात, याची उत्सुकता जगभरातील त्यांच्या चाहत्यांना नक्कीच असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here