कोलकाताने पंजाबपुढे विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला कर्णधार लोकेश राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. राहुलने यावेळी चार चौकारांच्या जोरावर २८ धावा केल्या. राहुल बाद झाल्यावर गेल आणि मनदीप यांची चांगलीच जोडी जमलेली पाहायला मिळाली. कारण या दोघांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी रचली. या दोघांनी संघाला विजय दृष्टीपथात आणून दिला होता. पण विजयासाठी चार धावा हव्या असताना गेल बाद झाला. गेलने यावेळी २९ चेंडूंत २ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५१ धावांची भागीदारी रचली. पण मनदीपने यावेळी नाबाद राहात संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मनदीपने यावेळी ५६ चेंडूंत ८ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ६६ धावांची महत्वाची खेळी साकारली.
कोलकाता नाइट रायडर्सची या सामन्यात ३ बाद १० अशी अवस्था झाली होती. पण यावेळी सलामीवीर शुभमन गिलने झुंजार अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्याता मोलाचा वाटा उचलला. गिलने यावेळी कर्णधार इऑन मॉर्गनबरोबर चौथ्या विकेटसठी ८१ धावांची महत्वपूर्ण भागीदारीही रचली. त्यामुळे कोलकाताला पंजाबपुढे १५० धावांचे आव्हान ठेवता आले. गिलने यावेळी ४५ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५७ धावांची दमदार खेळी साकारली.
कोलकाताची यावेळी ३ बाद १० अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांनी संघाला सावरले. या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी यावेळी ८१ धावांची भागीदारी रचून संघाला सुस्थितीत आणले. पण पंजाबचा फिरकीपटू रवी बिश्नोईने ही जोडी फोडली. रवीने यावेळी मॉर्गनला बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. मॉर्गनने यावेळी २५ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४० धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times