होबार्ट: स्टार टेनिसपटू हिने दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन करत दुहेरी स्पर्धेच्या किताबावर आपले नाव कोरले. ३३ वर्षीय सानियाने स्पर्धेदरम्यान तिची युक्रेनची सहकारी खेळाडू नादिया किचेनोक हिच्यासोबत उत्तम कागिरीचे प्रदर्शन केले. सानियाचा हा विमेन्स टेनिस असोसिएशनच्या दुहेरीतील ४२ वा किताब आहे. तर, सानिया आई बनल्यानंतरचा हा पहिलाच किताब आहे.

आज (शनिवार) झालेल्या अंतिम सामन्यात या इंडो-युक्रेनी (सानिया-नादिया) जोडीने झांग शुइ आणि पेंग शुइ चीनी जोडीवर ६-४,६-४ ने मात केली. हा मुकाबला १ तास २१ मिनिटे चालला. सानिया-नादिया या जोडीने स्लोवोनियाई-चेक जोडी तमारा जिदानसेक आणि मॅरी बुजकोवा यांच्या सुरुवातीच्या संघर्षानंतर ७-६ (३), ६-२ ने मात देत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

सानियाने दोन वर्षांनंतर टेनिस कोर्टवर यशस्वी पुनरागमन केले आहे. इंटरनॅशनल स्पर्धेपूर्वी सानियाने ऑक्टोबर २०१७ मध्ये शेवटचा चायन ओपनची लढत दिली होती. सानिया टेनिसपासून दोन वर्षे दूर होती. या काळात तिने बाळाला जन्म दिला. हा ब्रेक घेण्यापूर्वी ती जायबंदी देखील झाली होती.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here