काल सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. पंजाब संघात हा अचानक बदल कसा काय झाला, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. गेल्या पाच सामन्यात पंजाबने संघात एक बदल केला आहे. हा बदल त्यांच्यासाठी लकी ठरतोय.
वाचा-
गेल्या पाच सामन्यापासून पंजाब संघाकडून युनिवर्सल बॉस अर्थात (किंग्ज इलेव्हन पंजाब ) खेळत आहे. गेलचा अंतिम ११ मध्ये समावेश केल्यापासून पंजाबने एकही सामना गमावलेला नाही. गेलने ५ सामन्यात १७७ धावाकेल्या आहेत. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी नसली तरी जो संघ आठव्या क्रमांकावर होता आणि आयपीएलमधील त्यांचे आव्हान संपुष्ठात आले असते तो आता प्ले ऑफमधील चौथ्या स्थानाचा मुख्य दावेदार झाला आहे.
वाचा-
आयपीएलमधील गेल असा एक खेळाडू आहे ज्याची फलंदाजी पाहण्याची इच्छा प्रत्येक भारतीय चाहत्याला असते. त्याच बरोबर गेलची पर्सनल लाइफ देखील लोकांना आकर्षित करत असते. सोमवारी KKR विरुद्ध त्याने २९ चेंडूत ५१ धावा केल्या आणि पंजाबला सलग पाचवा विजय मिळून दिला.
या विजयानंतर किंग्ज इलेव्हनने एक ट्विट शेअर केला आहे. यात ते म्हणतात, शेर की उम्र ज्यादा है लेकिन बुड्ढा नहीं हुआ अभी तक।
वाचा-
गेल मैदानात पळून धावा करत नाही तर त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकाराने अधिक धावा निघतात. टी-२० त्याने आतापर्यंत १३ हजार ३४९ धावा केल्या आहेत. त्यापैकी १० हजार धावा फक्त चौकार आणि षटकाराने आल्या आहेत. टी-२० मध्ये चौकार आणि षटकाराने १० हजार धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आतापर्यंत ४०५ टी-२० सामने खेळणाऱ्या गेलने ९८३ षटकार आणि १ हजार २७ चौकार मारले आहेत.
वाचा-
आयपीएलच्या सुरुवातीला गेल कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळायचा २०११ साली तो रॉयल चॅलेंजर्सकडे आला, २०१८ पासून तो किंग्ज इलेव्हनकडून खेळतोय. IPL मध्ये त्याने ३२६ षटकार मारले आहेत तर ४ हजार ४८४ धावा केल्या आहेत. २०१३ साली गेलने असा एक विक्रम केला आहे जो आजपर्यंत मोडला गेला नाही. त्याने पुणे वॉरियर्स विरुद्ध १३ चौकार आणि १७ षटकारांसह नाबाद १७५ धावा केल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times