नवी दिल्ली : भारतीय संघात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मधल्या फळीत प्रयोग सुरुच आहेत. याचा थेट परिणाम आता अष्टपैलू खेळाडू केदार जाधववर दिसू लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केदार जाधववरुन टीम इंडिया सध्या द्विधा मनस्थितीत आहे. केदार जाधवच्या संघातील समावेशाबाबत विचार केला जात आहे. कारण, गेल्या तीन वर्षांपासून मधल्या फळीत अजून कोणत्याही फलंदाजाने विश्वास दिलेला नाही.

मधल्या फळीसाठी प्रयोग करताना कायम संघासोबत जोडला गेलेला होता. पण आता केदार जाधवला संघात ठेवायचं की नाही याबाबत संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत. संघ व्यवस्थापनातील एका सूत्राच्या मते, ‘केदार जाधवला स्वतःला सिद्ध करण्याची आवश्यक संधी दिली आहे का याबाबत संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते एकदा आश्वस्त होत आहेत. या परिस्थितीत भारतीय संघाला एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची गरज भासत आहे, तर दुसरीकडे केदार जाधवच्या गोलंदाजीकडेही दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.’

याच दरम्यान मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवच्या समावेशाबाबतही चर्चा आहे. यादवने गेल्या काही मोसमात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. याशिवाय अजिंक्य रहाणेलाही वन डे संघात संधी देण्याबाबत विचार सुरू आहे. गेल्या अनेक मालिकांपासून संघासोबत असलेल्या मनीष पांडेलाही पुरेशी संधी मिळावी, असं संघ व्यवस्थापनाचं मत आहे. त्यामुळे टी-२० आणि वन डेमध्ये वेगवेगळं समीकरण ठेवायचं आहे किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय निवडकर्त्यांना घ्यायचा आहे.

केदार जाधवने ऑक्टोबर २०१७ पासून भारतासाठी एकही टी-२० सामना खेळलेला नाही. संघ व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या वन डे मालिकेत केदार जाधवला खेळण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे त्याची न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड होण्याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here