या सामन्यापूर्वी हैदराबादचा संघ हा गुणतालिकेत आठ गुणांसह सातव्या स्थानावर होता. या सामन्यापूर्वी हैदराबादने ११ सामने खेळले होते. या ११ सामन्यांमध्ये हैदराबादला चार विजय मिळवता आले होते, तर त्यांना सात पराभव पत्करावे लागले होते. पण या विजयानंतर मात्र हैदराबादला दोन गुण मिळाले आहे, त्याचबरोबर त्यांचा रनरेटही चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे या सामन्यातील विजयासह हैदराबादचे १० गुण झाले असून त्यांनी सहाव्या स्थानावर झेप झेप घेतली आहे. त्यामुळे त्यांचे या आयपीएलमधील आव्हान अजूनही कायम आहे.
दिल्लीच्या संघाला मात्र या पराभवानंतर चांगलाच धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाने ११ सामने खेळले होते. या ११ सामन्यांमध्ये त्यांनी सात विजय मिळवले होते, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराबव पत्करावा लागला होता. आजच्या सामन्यातही दिल्लीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दिल्लीच्या संघाची दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घरसण झाल्याचे पाहायला मिळाले. गुणतालिकेतील दुसरे स्थान आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पटकावले आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आज कर्णधार डेव्हिड वॉर्नरला वाढदिवसाची विजयी भेट दिल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आजच्यात सामन्यात सनरायझर्स हैदराबादपुढो लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादने दिल्लीपुढे २२० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादने भेदक गोलंदाजी करत दिल्लीच्या संघाला फक्त १३१ धावांमध्ये सर्व बाद केले आणि आजच्या सामन्यात त्यांनी ८८ धावांनी मोठा विजय साकारला. या विजयाचा नक्कीच फायदा हैदराबादच्या संघाला गुणतालिकेत होणार आहे. आता यापुढील दोन सामन्यांमध्ये ते कशई कामगिरी करतात, यावर त्यांचे आव्हान अवलंबून असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times