नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने कसोटी, वनडे आणि टी-२० मालिकेसाठीच्या संगाची घोषणा केली. या तिनही संघातून हिटमॅन अर्थात रोहित शर्माला बाहेर ठेवण्यात आले. जखमी असल्यामुळे त्याचा विचार करण्यात आला नसल्याचे सांगितले गेले. पण दुसऱ्या बाजूला भारताचा संघ जाहीर होण्याआधी रोहित शर्मा नेट मध्ये सराव करताना दिसत होता.

एका बाजूला दुखापतीमुळे बाहेर ठेवण्यात आलेला रोहित सराव करत होता. तर दुसऱ्या बाजूला ज्या मयांक अग्रवालचा संघात समावेश केला आहे, तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दुखापतीमुळे दोन लढती खेळू शकला नाही. या घटनेवर चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी #Hitman हा हॅशटॅग वावरून कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री तसेच बीसीसीआयला ट्रोल केले आहे.

याचे उत्तर आहे का बीसीसीआयकडे?

या चाहत्याने केला मोठा आरोप

संघात राजकारण होत आहे- चाहत्यांचा आरोप, रोहितने सोशल मीडियावर बायो बदलला

जखमी नाही तर संघाबाहेर का? बोर्डाकडे कोणते कारण आहे

हिटमॅन सारखा कोणी नाही

रोहित शर्माचा संघात समावेश न झाल्याबद्दल भारताचे माजी महान फलंदाज सुनिल गावस्कर यांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता. रोहितला काय झाले आहे हे जाणून घेण्याचा आधिकार चाहत्यांना असल्याचे ते म्हणाले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here