नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात किमात एक दोन भारतीय खेळाडू लक्ष्यवेधी कामगिरी करताना दिसत आहे. मंगळवारी (Sunrisers Hyderabad) ने (Delhi Capitals) वर ८८ धावांनी मोठा विजय मिळवला.

वाचा-

या सामन्यात सनरायजर्सकडून ऋद्धिमान साहाने फक्त ४५ चेंडूत ८७ धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या या खेळीचे कौतुक खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी केले.

वाचा- .

वाचा-
न घ्या

सोशल मीडियावर देखील साहाचे कौतुक होताना दिसत आहे. साहा अशा पद्धतीच्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखला जात नाही. कसोटीपटू असा शिक्का त्याच्यावर असताना त्यांनी ही खेळी केली. या मॅचनंतर साहाची पत्नी मित्राने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले.

वाचा-

इस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने साहाला विचारले की, ऋद्धिमान पटकन या प्रश्नाचे उत्तर दे, आज काय जेवला होतास?

साहाने कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेसह हैदराबादला २१९ धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. साहाने ४५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह ८७ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १९३.३३ इतका होता. उत्तरा दाखल दिल्लीला फक्त १३१ धावा करता आल्या. या मोठ्या विजयामुळे सनरायजर्सच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here