वाचा-
सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या () याची निवड भारतीय क्रिकेट संघात न झाल्याने अनेक जण नाराज झाले आहेत. सुर्यकुमारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. पण बीसीसीआयच्या निवड समितीने त्याच्या कामगिरीकडे कधीच लक्ष दिले नाही. यावेळी देखील सुर्यकुमारला संधी न दिल्याने चाहत्यांनी बीसीसीआयवर राग व्यक्त केला आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी देखील यावर नाराजी व्यक्त केली. माजी फिरकीपटू हरभजन सिंगने बीसीसीआयला विनंती केली आहे की त्यांनी एकदा सुर्यकुमारचे रेकॉर्ड जरुप पाहावेत.
हरभजन सिंगनंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष यांनी देखील निवड समितीच्या या निर्णयावर अश्चर्य व्यक्त केले आहे.
सुर्यकुमार हा सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याचा संघात समावेश न केल्याबद्दल मी निराश झालो आहे. तो देशातील एक चांगला फलंदाज आहे, असे वेंगसरकर म्हणाले. क्षमतेचा प्रश्न असेल तर सुर्यकुमारची तुलना मी भारतीय संघातील सर्वोत्तम खेळाडूशी करू शकतो. त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. मला माहिती नाही की भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काय करावे लागते.
एका मुलाखतीत वेंगसरकरांनी भारतीय संघातील क्रिकेटपटूसोबत सुर्यकुमारची तुलना केली आणि अध्यक्ष सौरव गांगुलीकडे मागणी केली की, या खेळाडूला संघात का घेतले नाही याची चौकशी केली जावी.
एखाद्या फलंदाजाचा सर्वोत्तम काळ हा २६ ते ३४ या वयाच्या दरम्यान असतो. सुर्यकुमार आता ३० वर्षाचा आहे. फॉर्म आणि फिटनेस हा मापदंड नसेल तर काय आहे. कोणी सांगू शकेल का? जर रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर गेला असेल तर मधळी फळी मजबूत करण्यासाठी सुर्यकुमारला संघात घेणे गरजेचे होते. बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने त्याला वगळण्यामागे काय कारण होते यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत असे वेंगसरकर म्हणाले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times