मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. आरसीबीकडून यावेळी आरोन फिंचऐवजी जोश फिलीप हा सलामीला आल्याचे पाहायला मिळाले. फिलीप आणि देवदत्त पडीक्कल यांनी यावेळी आरसीबीला चांगली सलामी करून दिली. पहिल्या पाच षटकांमध्ये या दोघांनी ४२ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने यावेळी आरसीबीला पहिला धक्का दिला. चहरने फिलीपला बाद केले, फिलीपने यावेळी ३३ धावा केल्या.
फिलीप बाद झाल्यावर फलंदाजीला आला तो आरसीबीचा कर्णधार विराट कोहली. पण कोहलीला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. मुबंईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने यावेळी कोहलीचा बळी मिळवला, कोहलीला यावेळी ९ धावांवरच समाधान मानावे लागले. कोहली बाद झाला असला तरी पडीक्कल हा दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी करत होता. पडीक्कलने यावेळी आपले अर्धशतकही साजरे केले.
पडीक्कल आणि एबी डीव्हिलियर्स यांची जोडी यावेळी चांगलीच जमल्याचे पाहायला मिळत होते. पण डीव्हिलियर्सला यावेळी मुंबईचा कर्णधार किरॉन पोलार्डने बाद केले. डीव्हिलियर्सला यावेळी १५ धावांवर समाधान मानावे लागले. जसप्रीत बुमराने आपल्या १७व्या षटकात आरसीबीला दोन धक्के दिले. प्रथम बुमराने शिवम दुबेला आऊट केले. पण त्यानंतर अर्धशतकवीर देवदत्त पडीक्कलाही बाद करत मुंबईला मोठे यश मिळवून दिले. पडीक्कलने यावेळी ४५ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७४ धावा करता आल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times