यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी धावपटूंची संख्या वाढली होती. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली होती. मॅरेथॉनमध्ये गजानन माजलकर हे देखील सहभागी झाले होते. धावत असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. गजानन यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
वाचा-
ज्येष्ठ नागरिक गजानन माजलकर यांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. माजलकर हे ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनमधून धावत होते. धावात असताना त्यांना झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या बॉम्ब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
मुंबई मॅरेथॉनमध्ये यावेळी सात जणांना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News