बेंगळुरू: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. मालिकेत पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्कारल्यानंतर भारतीय संघाने राजकोट येथे शानदार विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी खेळतील.

बेंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघासमोर समालामीच्या जोडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. राजकोट येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात याला फलंदाजी करताना दुखापत झाली होती. तर रोहित शर्माला फिल्डिंग करताना ४३व्या षटकात खांद्याला दुखापत झाली होती. भारताची ही ओपनर जोडी खेळणार की नाही याबद्दलचा निर्णय सामना सुरू होण्यापूर्वी घेतला जाणार आहे.

वाचा-

शिखर धवन आणि हे दुखापतीतून बाहेर आले आहेत. त्यांच्या दुखापतीवर बारीक नजर आहे आणि ते अंतिम वनडेत खेळणार की नाही याबाबतचा निर्णय सामना सुरू होण्यातआधी घेतला जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. जर हे दोन्ही फलंदाज खेळू शकले नाही तर अंतिम सामन्यात भारताच्या फलंदाजीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

वाचा-

राजकोट येथे झालेल्या सामन्यात शिखर धवन याने ९६ तर रोहित शर्मा याने ४२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. आता भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला भारतीय भूमीवर सलग दुसऱ्या मालिका विजयापासून रोखायचे आहे.

वाचा-

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here