बेंगळुरू: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बेंगळुरू येथे तिसरा आणि अखरेचा सामना सुरु आहे. निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून विजय मिळवला होता. तर राजकोट येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने कमबॅक करत शानदार विजय मिळवला होता.

मैदानावर सामना पाहण्यासाठी येणारे अनेक क्रिकेट चाहते काही तरी हटके प्रयोग करून कॅमेऱ्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. काही क्रिकेट चाहते एखादा फलक हातात घेऊन त्यावर कॅची ओळ लिहितात. काही चाहते वेगळा ड्रेस घालून मैदानात येतात. तर काही जण अंगावर भारताचा झेंडा अथवा त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूचे चित्र रंगवतात.

वाचा-

बेंगळुरू येथे सुरु असलेल्या सामन्यात अशाच एका पोस्टरकडे सर्वांचे लक्ष गेले आणि या पोस्टरची दखल खुद्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने देखील घेतली. भारतीय क्रिकेटच्या एका चाहता हातात फलक घेऊन उभा होता. त्याने त्यावर लिहले होते, मी देखील बुमराहसारखी गोलंदाजी करू शकतो.

वाचा-

आयसीसीने नेमकी याच ओळीची दखल घेत. त्याचा फोटो ट्विटवर शेअर केला आणि चाहत्यालाच प्रश्न केला की, तु जसप्रीत बुमराहसारखी गोलंदाजी करू शकतो तर आम्हाला त्याचा व्हिडिओ पुरावा हवाय.

आयसीसीचे हे ट्वीट क्रिकेट चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here