बेंगळुरूः ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने २-१ ने खिशात घातली. या मालिकेतील अखेरच्या म्हणजे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. कर्णधार विराट कोहलीने १०० डावांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

बेंगळुरू येथे विराट कोहलीने १०० डावांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत २४५ सामने खेळले असून, २३६ डावांमध्ये त्याने ही किमया केली आहे. अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. या यादीत सर्वोच्च स्थानावर मास्टर ब्लास्टर आहे. सचिन तेंडुलकरने ४६३ सामन्यातील ४५२ डावात १४५ वेळा ५० वेळा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत ४९ शतके आणि ९६ अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये एकूण ५७ अर्धशतके आणि ४३ वेळा शतके झळकावली आहेत.

श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संघकाराने ११८ वेळा, ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने ११२ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यात सर्वात जलद ५ हजार धावा पूर्ण करणारा कर्णधार म्हणूनही नव्या विक्रमाची नोंद केली आहे. या कामगिरीने विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला मागे टाकले आहे. कर्णधार म्हणून सर्वात जलद ५ हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here