ब्लोमफोन्टेन (दक्षिण आफ्रिका): दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने विजयी सलामी देत श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ९० धावांनी पराभव केला. भारताने श्रीलंकेला विजयासाठी २९८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, श्रीलंकेचा संघ २०७ धावांत गारद झाला.

भारताने दिलेल्या २९८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर नवोद पर्नवितना ६ धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या रविंदू रसंथा आणि सलामीवीर कमिल मिशारा यांनी संयमी खेळ केला आणि भागीदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रसंथाला बाद करत भारतीय गोलंदाजांनी ही जोडी फोडली. यानंतर श्रीलंकेचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिले. मधल्या फळीतील याने अर्धशतक झळकवत संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला अन्य फलंदाजांची योग्य साथ लाभली नाही. अखेरीत २०७ धावांवर श्रीलंकेचा डाव गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आहे आणि विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय भारताने आपल्या नावावर केला. भारताकडून अक्ष सिंह, सिद्धेश वीर आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी २, तर कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा आणि यशस्वी जैस्वालने प्रत्येकी एक बळी घेतला.

दरम्यान, नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय श्रीलंकेच्या फळला नाही. भारतीय फलंदाजांची मिळालेल्या संधीचा फायदा घेत श्रीलंकेच्या फलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. सलामीला आलेल्या आणि दिव्यांश सक्सेना यांनी पहिल्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वाल, कर्णधार आणि ध्रुव जोरेल यांनी अर्धशतकी खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. निर्धारित ५० षटकांमध्ये भारताने आपला डाव ४ गड्यांच्या मोबदल्यात २९७ धावा केल्या. श्रीलंकेकडून अमशी डी-सिल्वा, अशीन डॅनिअल, दिलशान मधुशनका आणि कविंदू नदीशन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here