बेंगळुरू: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने ७ विकेटनी शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने नव वर्षातील पहिली वनडे मालिका जिंकली. आता भारतीय संघाचे पुढील लक्ष्य न्यूझीलंड असणार आहे. पण या दौऱ्याआधीच भारतीय संघाला झटका बसला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारताचा सलामीवीर क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना पाचव्या षटकात अ‍ॅरोन फिंच याने मारलेला चेंडू रोखण्याचा प्रयत्न करत असताना शिखर जखमी झाला. या घटनेनंतर शिखरला मैदान सोडावे लागले आणि त्याच्या ऐवजी यजुवेंद्र चहल मैदानात आला.

वाचा-

शिखरचे एक्स-रे घेण्यात आले आणि त्यानंतर तो फलंदाजीसाठी देखील मैदानात आला नाही. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरूवात केली. सामना झाल्यानंतर जेव्हा शिखर मैदानात दिसला तेव्हा त्याच्या हाताला पट्टी लावण्यात आली होती. शिखरच्या दुखापतीमुळे आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी तो उपलब्ध असेल का याबद्दल शंका निर्माण झाली आहे.

वाचा-

भारत न्यूझीलंडविरुद्ध २४ जानेवारी रोजी पहिला टी-२० सामना खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ सोमवारी रवाना होणार आहे. शिखरच्या खांद्याला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पॅट कमिन्सचा चेंडू लागल्याने शिखरला क्षेत्ररक्षण करता आले नव्हते. गेल्या काही काळापासून शिखर वारंवार जखमी होत आहे.

गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपदरम्यान शिखरचा अंगठा फॅक्चर झाला होता. तर सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याच्या गुढघ्याना दुखापत झाली होती आणि त्याला २७ टाके पडले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here