ब्लोमफोन्टेन/ लिंकन/बेंगळुरू: रविवारचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खास ठरला भारताच्या तीन संघांनी शानदार विजय मिळवला. यातील दोन विजय हे परदेशात मिळवले तर एक विजय घरच्या मैदानावर मिळवला. क्रिकेटमध्ये एकाच देशाच्या तीन संघांनी विजय मिळवण्याची अनोखी घटना घडली आहे.

ऑस्ट्रेलियाचा बेंगळुरू येथे झालेल्या सामन्यात ७ विकेटनी विजय मिळवत भारतीय संघाने मालिका जिंकली. देशातील सर्व चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे होते. भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील पराभवाचे नैराश्य मागे टाकत राजकोट आणि बेंगळुरू येथे शानदार विजय मिळवला. भारताच्या मुख्य संघाबरोबरच ज्युनिअर संघाने देखील असाच शानदार विजय मिळवला. तर भारताच्या अ संघाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला.

वाचा-

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. गतविजेत्या भारतीय संघाने लंकेचा ९० धावांनी पराभव केला. लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांची मिळालेल्या संधीचा फायदा घेत श्रीलंकेच्या फलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. सलामीला आलेल्या
आणि दिव्यांश सक्सेना यांनी पहिल्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वाल, कर्णधार
आणि ध्रुव जोरेल यांनी अर्धशतकी खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. भारताने ५० षटकात ४ बाद २९७ धावा केल्या. उत्तरादाखल श्रीलंकेचा डाव २०७ धावांत आटोपला.

सर्व चाहते भारतीय मुख्य संघाचा सामना पाहत होते. तेव्हाच आफ्रिकेत भारताचा १९ वर्षाखालील संघाने देखील विजय मिळवला. तुम्ही हा सामना पाहिला नसले तर या सामन्याचे हायलाइट्स पाहा-

श्रीलंकेविरुद्ध भारताच्या यशस्वी जैस्वाल याने ५९ धावांची खेळी केली.

रविवारी त्याआधी भारताच्या अ संघाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. या सामन्यात पृथ्वी शॉने वादळी खेळी करत १०० चेंडूत १५० धावा केल्या होत्या. भारताने न्यूझीलंडवर १२ धावांनी विजय मिळवला.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here