>> भारताचा ओपनर रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये ९ हजार धावा पूर्ण केल्या. वनडेत सर्वात वेगवान ९ हजार धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. रोहितने पहिल्याच षटकात ही कामगिरी केली. त्याने २१७ डावात ९ हजार धावा केल्या. यासाठी विराटने १९४ तर एबी डिव्हिलियर्सने २०८ डावात ही कामगिरी केली.
वाचा-
>> कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतक करण्याबाबत रोहित शर्माने विराट कोहलीशी बरोबरी केली. रविवारी रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधील ८वे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने देखील ८ शतक केली आहेत. या क्रमवारीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ९ शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.
>> बेंगळुरूमध्ये रोहितने वनडेमधील २९वे शतक केले. वनडेमध्ये सर्वाधिक शतक करण्याबाबत तो चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकानंतर त्याने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले. वनडेमधील सर्वाधिक शतकाच्या क्रमवारीत सचिन (४९ शतक), विराट कोहली (४३) आणि रिकी पॉन्टिंग (३०) यांचा क्रमांक लागतो.
वाचा-
>> भारताचा कर्णधार विराट कोहलीने वनडे सर्वात वेगाने ५ हजार धावा करणारा कर्णधार ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथी धाव घेत विराटने हा विक्रम केला. कर्णधार म्हणून ८२ डावात विराटने ५ हजार धावा केल्या. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १२७ डावात ही कामगिरी केली.
>> ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद शमी चार विकेट घेतल्या. शमीने वनडे दहाव्यांदा अशी कामगिरी केली आहे. भारताकडून सर्वाधिक वेळा चार विकेट घेण्याचा विक्रम अजित आगरकरच्या नावावर आहे. आगरकरने १२ वेळा अशी कामगिरी केली. तर जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी १० वेळा कामगिरी केली आहे.
>> धावांचा पाठलाग करताना चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने मिळवलेला हा नववा विजय आहे.
>> ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८०हून अधिक धावांचा पाठलाग करताना भारताने मिळवलेला हा सहावा विजय आहे. याआधी २४ वेळा ऑस्ट्रेलियाने भारताला २८०हून अधिक धावांचे आव्हान दिले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times