दुबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्याचा फायदा भारतीय खेळाडूंना झाला आहे. भारताचा कर्णधार आणि हिटमॅन या दोघांनाही क्रमवारीत अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले. तर मालिका विजयामुळे भारतीय संघाने वनडे क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. वनडेमध्ये इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या विराटने तीन सामन्यात १८३ तर रोहित शर्माने १७१ धावा केल्या. रोहितने बेंगळुरूमध्ये ११९ धावांची खेळी केली होती. वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत विराट पहिल्या तर रोहित दुसऱ्या स्थानावर कायम आहे. क्रमवारीत हे दोन फलंदाज वगळता अन्य भारतीयाला स्थान मिळाले नाही.

वाचा-

दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीतील ७६४ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. बुमराहनंतर ट्रेंट बोल्ड दुसऱ्या तर अफगाणिस्तानचा मुजीबर-उर-रहमान तिसऱ्या स्थानावर आहे. रविंद्र जडेजाला २७व्या स्थानावर आहे.

वाचा-

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर रोहितला ३ तर विराटला २ गुण मिळाले. विराट ८८६ गुणांसह पहिल्या तर रोहित ८६८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आजम ८२९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

क्रमवारीत शिखर धवनने मोठी उडी घेतली आहे. दोन डावात १७० धावा करणारा धवन २२व्या स्थानावरून १५व्या स्थानावर पोहोचला आहे. क्रमवारीत सर्वात मोठी उडी घेतील ती केएल राहुलने. तीन सामन्यांच्या मालिकेत १४६ धावा करणाऱ्या राहुलने २१ स्थानाचा उडी घेत जगातील पहिल्या ५० फलंदाजांमध्ये जागा मिळवली. भारताविरुद्ध २२९ धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ २३व्या क्रमांकावर पोहोचला.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here