सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या ३८ वर्षाच्या फेडररने पहिल्या फेरीत स्टिव्ह जॉनसन याचा ६-३, ६-२, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. फेडररने आतापर्यंत २० ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवली आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवून २१व्या ग्रँड स्लॅमचे स्वप्न साकारण्याचा फेडररचा प्रयत्न असेल.
वाचा-
यावेळी ऑस्ट्रेलियान ओपन स्पर्धेतून आपल्याला अधिक अपेक्षा नाहीत. कारण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी एटीपी कप स्पर्धेत भाग घेतला नव्हता. कोणत्याही सरावाशिवाय कोर्टवर उतरलेल्या फेडररने पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवला. अमेरिकेच्या जॉनसनविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये ६-३ने विजय मिळवल्यानंतर पुढील दोन्ही सेट ६-२ या फरकाने जिंकले.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times