नवी दिल्ली:
श्रीलंकेचा गोलंदाज मथीशा पथिराना याची बोलिंग स्टाईल इंटरनेटवर व्हायरल होते आहे. रविवारी त्याने भारतीय अंडर १९ टीमच्या विरुद्ध खेळताना चक्क १७५ किलोमीटर प्रतितास वेगाने एक चेंडू फेकला. अर्थात, हा चेंडू खरंच इतक्या वेगात होता की स्पीडोमीटरमध्ये काही गडबड झालेली ते अद्याप कळालेलं नाही. आयसीसीने अद्याप याबाबत अधिकृत निवेदन दिलेलं नाही.

पथिरानाने हा चेंडू भारताचा यशस्वी फलंदाज जयस्वालला फेकला होता. चौथ्या षटकाचा हा अखेरचा चेंडू होता. तो यशस्वी जयस्वालच्या लेग साइटने निघून मागे यष्टीरक्षकाच्या हाती गेला. अंपायरने तो वाइड असल्याचा निर्णय दिला. यादरम्यान टीव्ही स्क्रीनवर जेव्हा बॉलचा स्पीड दाखवला, तेव्हा सर्वच जण हैराण झाले. पथिराना त्याचा सिनीअर गोलंदाज लसिथ मलिंगा याच्या गोलंदाजीशी मिळत्याजुळत्या स्टाइलमुळे चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ट्रीनिटी कॉलेज कँडीसाठी आपला पदार्पणातील सामन्यात पथिरानानं केवळ ७ धावा देऊन ६ विकेट्स काढल्या होत्या.

U19 WC: भारताला जिंकण्याचा अंदाज
भारताने अंडर १९ वर्ल्ड कप मधील आपल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेच्या संघाला ९० धावांनी मात दिली. भारतीय अंडर १९ टीमने ४ विकेट्स २९७ धावा केल्या. श्रीलंकेची टीम ४५.२ षटकांमध्ये २०७ धावांवर ऑलआऊट झाली.

शोएब अख्तरच्या नावे विक्रम

आतापर्यंत सर्वाधिक वेगात गोलंदाजीचा विक्रम पाकिस्तानची ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरच्या नावे नोंदवण्यात आला आहे. त्याने २००३ मध्ये इंग्लंडविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत १६१.३ किमी प्रति तास वेगाने चेंडू फेकला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here