सिडनी: क्रिकेटमध्ये अनेकदा आक्रमक चेंडूचा फटका फलंदाजांना बसतो. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश टी-२० लीग () स्पर्धेत वेगवान चेंडू फलंदाजाच्या अंगावर आला. १४१.५ किमी वेगाने आलेला चेंडू प्रथम बॅट आणि नंतर खांद्याला लागल्यानंतर फलंदाज तेथेच कोसळला. पण त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सच्या () विरुद्ध झालेल्या सामन्यात मेलबर्न स्टार्स () संघाला दोन झटके बसले. या सामन्यात मेलबर्न संघाचा पराभव झाला आणि धडाकेबाज फलंदाज () जखमी झाला. पावसामुळे हा सामना १४ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करत सिडनी संघाने १४ षटकात ४ बाद १४३ धावा केल्या. सिडनीकडून कर्णधार मोइसेस हेनरिक्सने सर्वाधिक ७२ धावा केल्या.

विजयासाठी १४४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मेलबर्न १२५ धावांपर्यंत मजल मारता आली. मेलबर्नच्या डावात जलद गोलंदाज बेन ड्वारशुइसचा चेंडू मॅक्सवेलच्या अंगाला लागला. चेंडू इतक्या वेगाने आला की मॅक्सवेल खाली कोसळला. मैदानातील खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली. तो थोडावेळ तेथेच बसला. त्यानंतर पुन्हा फलंदाजीकरण्यासाठी तयार झाला.

हेल्मेट असल्यामुळे मॅक्सवेल याला कोणतीही दुखापत झाली नाही. गोलंदाज आणि सिडनीच्या अन्य खेळाडूंनी येऊन मॅक्सवेलची चौकशी केली. या घटेनंतर दुसऱ्याच चेंडूवर मॅक्सवेलने चौकार मारत गोलंदाजाला स्वत:च्या स्टाइलने उत्तर दिले.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात भारताच्या ऋषभ पंतला देखील असाच चेंडू लागला होता. राजकोट येथे झालेल्या वनडे सामन्यात पंतच्या हेल्मेटला पॅट कमिन्सचा चेंडू लागला होता. त्यानंतर पंतला विश्रांती देण्यात आली होती आणि २४ तासहून अधिक काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here