नवी दिल्ली: टी-२० क्रिकेटमुळे वनडे आणि वेगवान झाले आहे. अनेक वेळा वनडे आणि कसोटीमध्ये फलंदाज टी-२० स्टाइलने फलंदाजी करतात. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. इतक नव्हे तर एका फलंदाजाने कसोटीत टी-२० स्टाइलने बॅटिंग केली आणि नवा विक्रम केला.

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू विकेट घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी केशवने कसोटी क्रिकेट फलंदाजी करत नवा विक्रम केला. केशवने कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने ८२वी ओव्हर टाकली. या ओव्हरमंध्ये केशवने २८ धावा केल्या.

कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केशव आता वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा आणि ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बेलीसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. लाराने २००३मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या रॉबिन पीटरसनच्या एका षटकात २८ धावा केल्या होत्या. तर जॉर्ज बेलीने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनविरुद्ध २०१३मध्ये २८ धावा केल्या होत्या. या क्रमवारीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २००६मध्ये हरभजन सिंगच्या एक षटकात २७ धावा केल्या होत्या.

वाचा-

केशवने रुटच्या पहिल्या तीन चेंडूवर चौकार मारले त्यानंतर दोन षटकार. अखरेचा चेंडू विकेटकिपरच्या हातातून निसटला आणि संघाला चार धावा मिळाल्या. या सामन्यात केशवने कसोटीमधील दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

वाचा-

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा एक डाव आणि ५३ धावांनी पराभव झाला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत २-१अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना २४ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे होईल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here