न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच बाबतीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. फलंदाजी तर भारतीय संघाची सर्वात मोठी ताकद आहे. पण आता भारताचा सलामीवीर शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. भारतीय संघ सोमवारी रात्री न्यूझीलंडसाठी रवाना झाला आणि न्यूझीलंडला जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून धवनला वगळण्यात आले.
गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपदरम्यान शिखरचा अंगठा फॅक्चर झाला होता. तर सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याच्या गुढघ्याना दुखापत झाली होती आणि त्याला २७ टाके पडले होते. त्यानंतर शिखरने पुनरागमन करत चांगली फलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यात शिखरने अनुक्रमे ७४ आण ९६ धावा केल्या होत्या.
वाचा-
बीसीसीआयकडून धवनच्या ऐवजी संघात कोणत्या खेळाडूला स्थान मिळेल याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या भारताचा अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. अ संघातील एखाद्या खेळाडूचा भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता आहे.
वाचा-
धवनची जागा घेण्यासाठी तिघांच्यात स्पर्धा
शिखर धवनच्या जागी मयांक अग्रवालचा संघात समावेश होऊ शकतो. आयसीसी वर्ल्ड कप संघात मयांकचा समावेश होता. त्याच बरोबर सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे देखील शिखरची जागा घेऊ शकतात. या दोघांनीही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
वाचा-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवन क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना पाचव्या षटकात अॅरोन फिंच याने मारलेला चेंडू रोखण्याचा प्रयत्न करत असताना शिखर जखमी झाला. या घटनेनंतर शिखरला मैदान सोडावे लागले. नंतर तो फलंदाजीसाठी देखील आला नव्हता.
असा आहे भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा
>> टी-२० मालिका
पहिली टी-२० : ऑकलंड- २४ जानेवारी २०२०
दुसरी टी-२०: ऑकलंड- २६ जानेवारी २०२०
तिसरी टी-२०: हॅमिल्टन- २९ जानेवारी २०२०
चौथी टी-२०: वेलिंग्टन- ३१ जानेवारी २०२०
पाचवी टी-२०: माऊंट माउंगानुई- ०२ फेब्रुवारी २०२०
>> वनडे मालिका
पहिली वनडे: हॅमिल्टन- ०५ फेब्रुवारी २०२०
दुसरी वनडे: ऑकलंड-०८ फेब्रुवारी २०२०
तिसरी वनडे : माऊंट माउंगानुई- ११ फेब्रुवारी २०२०
न्यूझीलंड अ संघाविरुद्ध ३ दिवसाचा सराव सामना: हॅमिल्टन- १४ ते १६ फेब्रुवारी
>> कसोटी मालिका
पहिली कसोटी: २१ ते २५ फेब्रुवारी- वेलिंग्टन
दुसरी कसोटी: २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च- ख्राइस्टचर्च
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times