सचिन आणि आनंद यांच्या ऐवजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि के.श्रीकांत यांना समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. तत्कालीन क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी २०१५मध्ये या समितीची स्थापना केली होती. डिसेंबर २०१५ ते मे २०१९ असा या समितीचा पहिला कार्यकाळ होता. यात राज्यसभा सदस्य म्हणून सचिन तेंडुलकर आणि खेळाडू म्हणून आनंदचा समावेश करण्यात आला होता.
वाचा-
सरकारने या समितीमधील सदस्यांची संख्या २७ वरून १८ केली आहे. सचिन, आनंद शिवाय बॅटमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बाइचुंग भूटिया यांना देखील समितीमधून वगळले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन आणि आनंद समितीच्या बैठकांना उपस्थित न राहिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. गोपीचंद सध्या टोकिओ ऑलिंम्पिकची तयारी करत आहेत. त्यामुळे ते व्यग्र आहेत. म्हणूनच समितीमध्ये त्यांचा विचार करण्यात आलेला नाही.
वाचा-
नव्या सदस्यांमध्ये तिरंदाज लिम्बा राम, पी.टी.उषा, बछेंद्री पाल, पॅरालिंपिक दीपा मलिक, नेमबाद अंजली भागवत, रेनेडी सिंह आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times