मेलबर्न क्रिकेट मैदानावर बुशफायर क्रिकेट बॅश सामना होणार आहे. या सामन्यात जागतिक क्रिकेटमधील निवृत्त खेळाडू खेळणार आहेत. या सामन्यातून गोळा होणारा पैसा पीडित लोकांना दिला जाणार आहे. सामन्यातील एका संघाचे नेतृत्व तर दुसऱ्या संघाचे नेतृत्व शेन वॉन करणार आहे. यापैकी पॉन्टिंगच्या संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सचिनवर असणार आहे. तर वॉनच्या संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी वेस्ट इंडिजचा दिग्गज गोलंदाज कर्टनी वॉल्शकडे असेल. येत्या ८ फेब्रुवारी रोजी हा सामना होणार आहे.
वाचा-
सचिन आणि वॉल्श यांचे स्वागत करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. या खास दिवसाची आम्ही देखील वाट पाहत आहोत. हे दोन्ही खेळाडू आयसीसी वॉल ऑफ फेम आहेत. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, तर वॉल्शने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट घेतल्या आहेत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) केव्हिन रॉबर्ट्स यांनी सांगितले.
वाचा-
सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी हा मदत निधीसाठीचा सामना खेळवला जाईल. पॉन्टिंग, वॉनसह जस्टिन लॅगर, अॅडम गिलख्रिस्ट, ब्रेट ली, शेन वॉटसन, अॅलेक्स ब्लॅकवेल आणि मायकल क्लार्क हे खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत.
वाचा-
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ आणि मेल जोन्स हे दोघेही नॉन प्लेइंग स्टाफ असतील. येत्या काही दिवसात दोन्ही संघातील खेळाडूंची नावे जाहीर केली जाणार आहेत. या सामन्यातून मिळणारा सर्व पैसा ऑस्ट्रेलियन रेड क्रॉस डिजास्टर रिलीफ अॅण्ड रिकव्हरी फंड या संस्थेला दिला जाईल.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times