बेंगळुरू: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील () वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना बेंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ७ विकेटनी मिळवला आणि मालिका २-१ असा विजय मिळवला. या मालिकेनंतर कर्नाटक संघाला दंड करण्यात आला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडेनंतर एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिकचे कप आढळले. यानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेला () प्लॉस्टिकचा वापर केल्याबद्दल दंड करण्यात आला. बेंगळुरू महानगर पालिकेने राज्य क्रिकेट संघटनेवर सिंगल युज प्लॉस्टिक कपचा वापर केल्याबद्दल ५० हजार रुपयांचा दंड केला आहे.

वाचा-

BBMPचे आयुक्त अनिल कुमार यांनी राज्य क्रिकेट संघटनेला ५० हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमवर सिंगल युज प्लॉस्टिकचा वापर करण्यात आला. अशा प्रकारच्या प्लॉस्टिकवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बंदी असताना देखील त्याचा वापर केल्याबद्दल पालिकेने हा दंड केला.

वाचा-

पालिका आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यांची यासंदर्भात अनेक वेळा बैठक झाली आहे. प्लॉस्टिकच्या करऱ्याची व्हिलेवाट लावण्यासंदर्भात ही बैठक झाली होती. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात बंदी घालेलल्या प्लॉस्टिक कपचा वापर केला गेला. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पालिकेने कारवाई केली.

वाचा-

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सिंगल युज प्लॉस्टिकवर बंदी घातील होती. राज्यातील सर्व जिल्हा, तालुका आणि महापालिका क्षेत्रा याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here