ब्लूफाँटन: १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या जपान विरुद्धचा सामना भारतीय संघाने १० विकेटनी जिंकला. ग्रुप ए मधील भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजीपुढे जपानचा संघ अवघ्या ४१ धावांवर बाद झाला. भारताने विजयाचे लक्ष्य एकही विकेट न गमवता पार केले.

जपान विरुद्ध भारताचा कर्णधार प्रियम गर्ग याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि एका पाठोपाठ एक विकेट घेतल्या. जपानचा संघ अवघ्या २२.५ षटकात ४१ धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे जपानच्या या ४१ धावांमध्ये भारतीय संघाने दिलेल्या १९ अतिरिक्त धावांचा देखील समावेश आहे.

वाचा-

विजयासाठीच्या ४२ धावांचे लक्ष्य भारताने ४.५ षटकात एकही विकेट न गमवता पार केले. भारताकडून यशस्वी जैस्वालने नाबाद २९ तर कुमार कुशाग्रने नाबाद १३ धावा केल्या. ग्रुप फेरीतील तीन पैकी दोन विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान या सामन्यात १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम जपानच्या नावावर नोंदवला गेला.

वाचा-

जपानकडून एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. त्यांचे ५ फलंदाज शून्यावर बाद झाले. भारतीय संघाकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ४, कार्तिक त्यागीने ३, आकाश सिंहने दोन विकेट घेतल्या. तर विद्याधर पाटीलने एक विकेट घेतली.

वाचा-

याआधी भारतीय संघाने श्रीलंकेचा ९० धावांनी पराभव केला होता. आता ग्रुप फेरीतील भारताचा अखेरचा सामना २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here