हॉर्बटने २० षटकांत १९० धावा करत मेलबर्न संघासमोर विजयासाठी १९१ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मेलबर्नकडून तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरलेला हार्पर सहा धावांवर खेळत असतानाच दुर्घटना घडली. नॉथन अॅलिसचा चेंडू सीमारेषेच्या दिशेने टोलवल्यानंतर पहिल्या धावेसाठी तो जोरात पळाला. हार्परचे लक्ष चेंडूकडे होते. त्यामुळेच गोंधळ झाला. नॉन स्ट्रायकर एंडवर स्टंप्सच्या बाजूला उभ्या असलेल्या नॉथनवरून चक्क हार्परने उडी घेतली. त्यामुळे हार्पर जमिनीवर जोरात आदळला. बराचवेळ तो जमिनीवर पडून होता. त्याला गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच पंचांनी डॉक्टरांना मैदानात पाचारण केले. प्रथमोपचार पुरेसे नसल्याचे ध्यानात घेऊन हार्परला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
या सामन्यात मेलबर्नचा केवळ ४ धावांनी पराभव झाला. हॉबर्टकडून मॅकलिस्टर राइटने नाबाद ७० व मॅथ्यू वेडने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली तर टीम मेलबर्नकडून शॉन मार्शने ५६, मोहम्मद नबीने ६३ आणि वेबस्टरने ५९ धावा केल्या. हाताशी आलेला सामना गमवावा लागल्याने आणि टीममधील स्फोटक फलंदाज मैदानाबाहेर गेल्याने टीम मेलबर्नचे समर्थक हिरमुसले.
बीबीएलच्या आगामी सामन्यांमध्ये हार्परच्या जागी टॉम कूपरला संधी दिल्याचे टीम मेलबर्नने ट्विट केले आहे. आगामी सामन्यांत मेलबर्नच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times