वर्ल्ड कपच्या तयारीसाठी संघातील वातावरण, खेळाडूंची दुखापत आदी विषयांवर चर्चा झाली आहे. फक्त टॉस जिंकणे हा मुद्दा नाही. आम्हाला जगातील सर्व देशात सर्व संघांविरुद्ध चांगली कामगिरी करायची आहे. भारतीय संघासाठी वर्ल्ड कप जिंकणे हा एक ध्यास आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व काही करू.
वाचा-
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात ५ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका मार्चमध्ये होणार आहे. भारतीय संघात प्रत्येकाच्या यशाचा आनंद सर्व जण घेतात. संघात ‘मी’ नव्हे तर ‘आपण’ या शब्दावर भर असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयात भारतीय संघाने मानसिक ताकद दाखवली. पहिल्या सामन्यात १० विकेटनी पराभव झाल्यानंतर भारताने शानदार कमबॅक केल्याचे शास्त्रींनी सांगितले.
वाचा-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत आमची मानसिक ताकद आणि दबावात खेळण्याच्या क्षमतेची परीक्षा झाली. वानखेडे मैदानावर पराभव झाल्यानंतर संघाने पुढील दोन सामन्यात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. अर्थात भूतकाळात जे झाले ते झाले. तशीच कामगिरी भविष्यात देखील करायची असल्याचे ते म्हणाले.
वाचा-
न्यूझीलंड दौऱ्यात शिखर धवनसारखा अनुभवी फलंदाज नसल्याचे दु:ख आहे. शिखरकडे सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. पण शिखरच्या जागी केएल राहुलच्या रुपाने फलंदाज आणि यष्टीरक्षक मिळाला आहे, शास्त्रींनी सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times