मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचा मित्र याला एक चॅलेंज दिले आहे. तुम्हाला वाटेल हे चॅलेंज क्रिकेटमधील एखादा विक्रम मोडण्याचे असावे, तर तसे नाही. सचिनने २०१७मध्ये एक गाण गायले होते. ‘ वाली बीट’ असे त्या गाण्याचे बोल होते. आता या गाण्यासंदर्भातच सचिनने कांबळीला चॅलेंज दिले आहे.

सचिन तेंडुलकरने मंगळवारी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिन आणि विनोद एका क्रिकेट स्टेडियममध्ये बोलत उभे आहेत. सचिन विनोदला ‘क्रिकेट वाली बीट’ या गाण्याचे रॅप व्हर्जन गाण्याचे चॅलेंज देतो. सचिनने यासाठी विनोदला एका आठवड्याची मुदत दिली आहे.

वाचा-

‘क्रिकेट वाली बीट’ गाण्याबद्दल सचिन आणि विनोद बोलत होते. तेव्हा विनोदने हे गाण माहित असल्याचे सांगितले. त्यावर सचिन विनोदला म्हणाला, मिस्टर कांबळी मी तुला ‘क्रिकेट वाली बीट’ हे गाण रॅप करण्याचे चॅलेंज देतो. त्यासाठी तुला एक आठवड्याची वेळ आहे. २८ जानेवारीपर्यंत सर्वांना या गाण्याचे रॅप व्हर्जन ऐकव.

वाचा-

सचिनने दिलेले हे चॅलेंज ऐकल्यानंतर विनोद रॅप स्टाइलने डान्स करतो. आता सचिनने दिलेले हे चॅलेंज विनोद पूर्ण करतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘क्रिकेट वाली बीट’ हे गाण सचिन आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी एकत्र गायले होते.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here