मुंबई: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत ५ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. मंगळवारी रात्री न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. २४ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेसाठीचा संघाची घोषणा याआधीच झाली होती.

भारतीय संघाच्या निवड समितीने वनडेसाठी १६ जणांची निवड केली. या १६ जणांमध्ये ५ जण मुंबईचे आहेत. यात वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश आहे.

वाचा-

न्यूझीलंडविरुद्ध पाच जानेवारीपासून वनडे मालिका होणार आहे. भारताच्या वनडे संघात मुंबईचे ५ खेळाडू आहेत. यात सलामीवीर रोहित शर्मा, पृथ्वी शॉ हे आघाडीचे तर मधल्या फळीतील श्रेयस अय्यर, अष्ठपैलू शिवम दुबे आणि जलद गोलदाज शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. हे पाचही खेळाडू मुंबईचे प्रतिनिधित्व करतात.

वाचा-

मुंबई क्रिकेटसाठी अभिमानाची गोष्ट

संपूर्ण देशातून भारताच्या मुख्य संघात १५-१६ जणांची निवड केली जाते. यापैकी ५ खेळाडू मुंबईचे आहेत, ही बाब मुंबई असोसिएशनसाठी अभिमानास्पद आहे. मुंबई शिवाय दिल्लीच्या तिघा खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. यात कर्णधार विराट कोहली, विकेटकीपर ऋषभ पंत आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे.

न्यूझीलंड दौऱ्याआधी शिखर धवन जखमी झाल्यामुळे त्याच्या ऐवजी टी-२० मालिकेत संजू सॅमसन तर वनडे मालिकेसाठी पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे.

असा आहे भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा

>> टी-२० मालिका

पहिली टी-२० : ऑकलंड- २४ जानेवारी २०२०
दुसरी टी-२०: ऑकलंड- २६ जानेवारी २०२०
तिसरी टी-२०: हॅमिल्टन- २९ जानेवारी २०२०
चौथी टी-२०: वेलिंग्टन- ३१ जानेवारी २०२०
पाचवी टी-२०: माऊंट माउंगानुई- ०२ फेब्रुवारी २०२०

>> वनडे मालिका

पहिली वनडे: हॅमिल्टन- ०५ फेब्रुवारी २०२०
दुसरी वनडे: ऑकलंड-०८ फेब्रुवारी २०२०
तिसरी वनडे : माऊंट माउंगानुई- ११ फेब्रुवारी २०२०

न्यूझीलंड अ संघाविरुद्ध ३ दिवसाचा सराव सामना: हॅमिल्टन- १४ ते १६ फेब्रुवारी

>> कसोटी मालिका

पहिली कसोटी: २१ ते २५ फेब्रुवारी- वेलिंग्टन
दुसरी कसोटी: २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च- ख्राइस्टचर्च

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here