मुंबई: स्पर्धेत मुंबईच्या याने विक्रमी त्रिशतक झळकावले. उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना सरफराजने प्रथम शतकी खेळी केली. त्यानंतर त्याचे रुपांतर द्विशतकात केले आणि मग प्रथम श्रेणी सामन्यातील पहिले त्रिशतक पूर्ण केले. सरफराजचे करिअरमधील ही सर्वोच्च खेळी ठरली. तो ३०१ धावांवर नाबाद राहिला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी स्पर्धेतील सामन्यात सरफराज खान याने ३८९ चेंडूत त्रिशतक केले. सरफराजच्या या खेळीत ३० चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या त्रिशतकाच्या खेळीत स्ट्राइकरेट ७६ इतका राहिला. मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक करणारा तो आठवा फलंदाज ठरला. मुंबईकडून २००९नंतर प्रथमच एखाद्या फलंदाजाने ३००हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी मुंबईकडून रोहित शर्माने ३०९ धावांची खेळी केली होती. रोहितनंतर त्रिशतक करणारा सरफराज पहिला खेळाडू ठरला आहे.

वाचा-

सेहवाग स्टाइलने केले त्रिशतक

२२ वर्षीय सरफराज खान २९४ धावांवर खेळत असताना षटकार मारला आणि त्रिशतक पूर्ण केले. सरफराजची ही खेळी पाहून सर्वांना आठवला तो भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग होय. सेहवाहने त्याच्या करिअरमध्ये अनेक वेळा २०० आणि ३०० धावांचा पल्ला षटकार मारून पार केला आहे. सेहवागने २५०वी धाव देखील षटकार मारूनच पूर्ण केली होती. वैयक्तीक कोणत्याही धावसंख्येवर खेळत असला तरी सेहवाग कधीच आक्रमक फलंदाजी सोडायचा नाही.

वाचा-

मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश याच्यातील हा सामना ड्रॉ झाला. उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ८ बाद ६२५ धावांवर डाव घोषित केला. उत्तरादाखल मुंबईने ७ बाद ६८८ धावा केल्या

वाचा- रणजी ट्रॉफीतील तिसरे त्रिशतक

रणजी ट्रॉफी २०१०-२० मध्ये सरफराज खानच्या रुपाने तिसरे त्रिशतक झळकावले गेले आहे. सरफराजच्या आधी बंगालकडून मनोज तिवारी आणि मिझोरामकडून तरुवर कोहली याने याच वर्षी नाबाद त्रिशतक पूर्ण केले होते. याशिवाय राहुल दलाला आणि संजय यांनी २५० हून अधिक धावांची खेळी केली आहे.

हे देखील वाचा- ला सामना

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here