नवी दिल्ली: जगातील सध्याचा सर्वोत्तम फलंदाज की , अशी चर्चा क्रिकेटविश्वात रंगलेली असताना खुद्द स्मिथने मात्र विराटच ग्रेट व अविश्वसनीय असल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. विराटचा धडाका पाहता तो अनेक विक्रम मोडणार आहे, असे सांगत स्मिथने विराटचे भरभरून कौतुक केले.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा संघातील सर्वात भरवशाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ विराटच्या फलंदाजीच्या प्रेमात पडला आहे. स्वत: एक दिग्गज फलंदाज असूनही त्याने मुक्तकंठाने विराटच्या फलंदाजीतील सातत्याला दाद दिली. स्मिथची विराटशी तुलना करण्यात येत आहे. त्याबाबत विचारले असता अत्यंत नम्रपणे विराटच्या फलंदाजीतील महानतेचे कौतुक त्याने केले. फलंदाजीसोबतच विराटच्या नेतृत्वाचीही त्याने भरभरून स्तुती केली.

विराट कोहली अफलातून आहे. त्याच्या नावापुढील कामगिरीचे आकडे सर्वकाही सांगणारे आहेत. माझ्या मते, कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. विराटने आजवर अनेक विक्रम मोडले आहेत आणि येणाऱ्या काळात तो आणखीही अनेक विक्रम मोडणार आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. विराट भविष्यात अनेक विक्रम आपल्या नावावर करेल व नवे शिखर गाठेल, असे चित्र मला स्पष्टपणे दिसत आहे, अशी प्रतिक्रिया स्मिथने दिली.

विराटमध्ये धावांची प्रचंड मोठी भूक आहे व ती कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आमच्या संघाला त्याला लगाम घालणे शक्य होईल, हा माझा नेहमीच आशावाद राहिलेला आहे, असेही स्मिथ पुढे म्हणाला. कर्णधार म्हणूनही विराट उजवा आहे. भारतीय संघाला कसोटीत त्याने पहिल्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. संघ हाताळण्याचे कौशल्य विराटकडे असून त्याने भारतीय संघाला नवी उंची गाठून दिलीय, असे म्हणायला काहीच हरकत नाही, असे मतही स्मिथने व्यक्त केले. विराटच्या फिटनेसलाही स्मिथने दाद दिली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here