वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अष्टपैलू केदार जाधवच्या भारतीय वन-डे संघातील स्थानाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले आहेत. त्याचा परीपूर्ण वापर केला जात नसताना, तो संघात कसा असे प्रश्न उपस्थित होत असले, तरी प्रशिक्षक यांनी त्याला पाठींबा दर्शविला आहे.

‘केदार हा न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या वन-डे संघाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक खेळाडूला मिळते तशीच वागणूक त्याला मिळणार आहे’, असे रवी शास्त्री यांनी सांगितले. केदार गोलंदाजीतही योगदान देत नाही. क्षेत्ररक्षणात तो कच्चा आहे. तरीदेखील त्याच्यावर अपयशी रिषभ पंतप्रमाणे विश्वास कायम ठेवण्यात आल्याची चर्चा होत आहे. त्याच वेळी कामगिरीत सातत्य राखणारा सूर्यकुमार यादव अद्यापही संघाच्या बाहेर आहे. याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘संघनिवडीचे काम निवड समितीचे. त्या विभागात मी भाग घेत नाही.’

वाचा-

इथे ‘मी’पणा नाही

येत्या २४ जानेवारीपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. त्यानंतर मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेचे आयोजनही होणार आहे. भारतीय संघातील वातावरण छान असून, संघातील प्रत्येक जण मिळून-मिसळून एकमेकांच्या यशाचा आनंद घेत आहे. ‘आमच्या भारतीय संघ ‘मी’ हा शब्दच नाही. इथे ‘आपण’ अशी संज्ञा अस्तित्वात आहे. त्यातून आमची एकजूट दिसून येते. कारण विजय भारतीय संघाचा होतो, कुणा एका खेळाडूचा नव्हे,’ असे ५७ वर्षांचे रवी शास्त्री यांनी सांगितले.

वाचा-

न्यूझीलंड दौऱ्यावरील तीन आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन अशा सहा वन-डेंना भारतीय संघ समोरा जाणार आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये रंगणाऱ्या वर्ल्ड टी-२० अजिंक्यपद स्पर्धा रंगणार आहे. त्या दृष्टिकोनातून या वन-डेदेखील टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीचा भाग असतील, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले. सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून, यात दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-२०, तीन वन-डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिली टी-२० २४ जानेवारीला खेळली जाईल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here