शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मला आनंद आहे की मी जो बोलतो त्याला महत्त्व दिले जाते. पण असे फार कमी लोक आहेत ज्यांना मी सांगितलेली गोष्ट कळते. काही लोकांना वाटते की मी पैसे कमावण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे कौतुक करतो. पण जे माझ्यावर आरोप करतात त्यांना मी विचारतो, भारतीय संघ जगातील नंबर एकचा संघ आहे की नाही? विराट कोहली नंबर एकचा फलंदाज आहे की नाही? जर या प्रश्नांची उत्तरे होय असतील तर त्यांचे कौतुक करण्यास हरकत काय आहे, असे त्याने म्हटले आहे.
वाचा-
एका व्हिडिओमध्ये सेहवाग म्हणाला, मी पैसे कमवण्यासाठी भारताचे कौतुक करतो. सेहवाग कधीच गंभीरपणे बोलत नाही. त्याने ते वाक्य विनोदाने आणि मजेत म्हटले होते. पण सेहवागला हे माहिती असेल की, भारतात माझे चाहते आहेत. मी बांगलादेशमध्ये जातो तेव्हा मला पाहण्यासाठी वाहतूक थांबते. ऑस्ट्रेलियात मी १० सेंकद देखील एकटा राहू शकत नाही. चाहते मला घेरतात. त्यामुळेच मी सेहवागला सांगतो की, तुझ्या डोक्यावर जितके केस नाहीत. त्याहून अधिक पैसे माझ्याकडे आहेत.
वाचा-
शोएब अख्तर भारतीय खेळाडूंचे कौतुक करतोय, असा प्रश्न सेहवागला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, भारतीय खेळाडूंचे कौतुक केल्याने शोएबचा फायदा होतो. अशा गोष्टी बोलल्यामुळे त्याला पैसे मिळतात.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times