नवी दिल्ली: न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिकेत पराभव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा विजय भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्यापासून (२४ जानेवारी) भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्याला सुरूवात करेल. या दौऱ्यात टीम इंडिया ५ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघाच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमधील त्यांची कामगिरी पाहणे देखील गरजेचे आहे.

वाचा-

>> टी-२० क्रिकेटमध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत १२ लढती झाल्या आहेत. त्यापैकी ८ लढती न्यूझीलंडने तर भारताने फक्त ३ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघातील एक मॅच रद्द झाली होती.

>> दोन्ही देशांच्या फलंदाजांचा विचार केल्यास ब्रॅन्डन मॅकलमने टी-२०मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहे. त्याने चार सामन्यात ३ अर्धशतकांसह १३०.५०च्या सरासरीने २६१ धावा केल्या आहेत.

वाचा-

>> भारताकडून टी-२०मध्ये न्यूझीलंडविरुद्ध माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सर्वाधिक २२१ धावा केल्या आहेत. धोनीने ११ सामन्यात २२१ धावा केल्या असून रोहितने ९ सामन्यात १९८ तर विराट कोहलीने ५ सामन्यात १९७ धावा केल्या आहेत.

>> गोलंदाजांचा विचार केल्यास इरफान पठाण आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी ५ विकेट घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, खलील अहमद, हार्दिक पंड्या, कुणाल पंड्या आणि हरभजन सिंह यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या आहेत.

>> दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत दोन द्विपक्षीय टी-२० मालिका झाल्या आहेत. या दोन्ही मालिकेत भारताचा पराभव झाला आहे. २००८-०९ मध्ये झालेल्या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा २-०ने पराभव केला. तर २०१८-१९मध्ये झालेल्या मालिकेत पुन्हा न्यूझीलंडने २-१ने विजय मिळवला.

वाचा-

>> न्यूझीलंडच्या भूमीवर भारताने फक्त एका टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. तर अन्य चार लढती गमवल्या आहेत.

>> आतापर्यंत ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या विराटने न्यूझीलंडमध्ये एकही टी-२० सामना खेळलेला नाही.

>> भारताचा हिटमॅन रोहित शर्माचा न्यूझीलंडमध्ये सर्व प्रकारच्या सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या ८७ इतकी आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here